1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. नरेंद्र मोदी वाराणसीमधून लढणार

नरेंद्र मोदी वाराणसीमधून लढणार

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लढविणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने यासंबंधी शनिवारी रात्री घोषणा केली. 
 
यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघ मोदी यांच्यासाठी सोडण्यास   विरोध दर्शविला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात आला असून मुरलीमनोहर जोशी कानपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. लखनौच्या प्रतिष्ठित जागेसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्क्षय राजनाथसिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. क्रिकेटपटू नवजेतसिंग सिध्दू याची समजूत घालण्यासाठी निवडणूक समितीने त्याला बोलावून घेतले होते. सिध्दू याने अरुण जेटली यांच्यासाठी अमृतसर मतदारसंघावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या इतर उमेदवारांमध्ये सुलतानपूर येथून वरुण गांधी, पिलीभीत येथून मेनका गांधी तसेच देवरिया येथून कलराज मिश्र निवडणूक लढविणार आहेत.