1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. मनसेच्या नगरसेविकेचे पद रद्द

मनसेच्या नगरसेविकेचे पद रद्द

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका प्रियांका शृंगारे यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक 112 च्या नगरसेविका होत्या.
 
नगरसेविका प्रियांका शृंगारे यांनी खाटीक समाजाचे जात प्रमाणपत्र निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरताना दिले होते. या प्रमाणपत्राची जात पडताळणी समितीने चौकशी केली. या चौकशीत त्यांनी हे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल निवडणूक अधिकार्‍यांनादिला. निवडणूक अधिकार्‍यांनी त्यावर कारवाई करत त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी प्रियांका शृंगारे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याची माहिती दिली.