1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. मोदी ‘जोगी’ तर दिग्गीराजा ‘भोगी’

मोदी ‘जोगी’ तर दिग्गीराजा ‘भोगी’

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे जोगी तर काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह हे भोगी आहेत, असे संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना इंद्रेशकुमार म्हणाले, जसोदाबेन यांची तुलना दिग्विजयसिंह यांच्याबरोबर करणे चुकीचे आहे. मोदी हे जोगी असून, दिग्विजयसिंह भोगी आहेत. मोदींची तुलना सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर केली आहे. मोदी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एकसारखे आहेत. एकजण महात्मा गांधी यांच्यासारखा तर दुसरा सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा आहे.

‘उत्तर प्रदेशात आरएसएस भाजपसाठी प्रचार करत आहे. जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी संघ प्रयत्न करत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नाराजीचे वृत्त निराधार आहे. अडवाणी व मोदी यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत,’ असेही इंद्रेशकुङ्कार यांनी म्हटले आहे.