शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 26 मे 2014 (11:03 IST)

मोदींच्या शपथविधीसोहळ्यावर जयललितांचा बहिष्कार

देशाची भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सोमवारी (दि. 26 मे) होत आहे. या शपथविधी सोहळ्यावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी  बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, जयललिता यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाचा एकही सदस्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही. श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना या कार्यक्रमास बोलावल्यास आपण गैरहजर राहणार असल्याचे जयललिता यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे जयललिता यांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे.

श्रीलंकेत तामिळ नागरिकांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर राजपक्षे मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र या सोहळ्याला आम्ही उपस्थिती देऊन तामिळ नागरिकांच्या भावना दुखावणार नसल्याचे जयललिता यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. एमडीएमकेचे सरचिटणीस वायको यांनीही राजपक्षे यांच्या भारत दौर्‍याला विरोध केला. राजपक्षे यांना सोमवारी काळे झेंडे दाखवून त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे वायको यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्लीत निदर्शने केली.