मोदींना फक्त खुर्ची हवी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना केवळ खुर्ची हवी आहे. त्यांचा जनतेच्या हिताशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे.
हिमाचल प्रदेशातील कुलू येथे प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली. त्या म्हणाल, मोदींनी शहिदांचा अपमान केला. कारगील युध्दातील शहीद जवान कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या ‘ये दिल माँगे मोअर’ या घोषवाक्याचा वापर मोदींनी केला आहे.
त्या म्हणाल्या की, मोदी अशाप्रकारे बोलत आहेत की, त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची मिळालीच आहे. निवडणुकीचे निकाल अद्याप लागलेले नाहीत; तरीही ते पंतप्रधान झाले आहेत अशा अविर्भावात वागत आहेत.
रुरकी येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसवर नसलेले भ्रष्टाचाराचे आरोप नरेंद्र मोदी करीत आहेत. ते काँग्रेसच्या विरोधात खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत असे सांगून त्यांनी गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये त्यांना लोकायुक्त का नियुक्त केला नाही, असा सवालही केला.
दुसर्याकडे बोट करताना मोदी यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे आणि गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये लोकायुक्त का नियुक्त केला नाही, याचे उत्तर द्यावे. मोदी यांनी हे लक्षात ठेवावे की, ज्यावेळी एक बोट आपण दुसर्याकडे करतो, त्यावेळी इतर बोटे आपल्याकडे निर्देश करीत असतात, असेही त्या म्हणाल्या.