राज ठाकरेंचा मुलायमसिंघांवर प्रहार
बलात्कारातील आरोपींना फाशी देणे अयोग्य असल्याचे वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मुलायम सिंगांनी अकलेचे तारे तोडल्यानंतर राज चांगलेच भडकलेत. तुमच्या घरी आया-बहिणी नाहीत का? असा थेट सवाल करत राज यांनी मुलायम सिंग यांच्यावर कडाडून टीका केली.
मुलांकडून चुका होत असतातच. काही वेळा बलात्कार होतात, म्हणून काही त्यांना फासावर चढवणे योग्य नाही. तसेच बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा देणे अयोग्य आहे, असे धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी एका जाहीर सभेत केले आहे. त्याचे सर्वत्रच पडसाद उमटत आहेत.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशी देण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार झाला पाहिजे असे मुलायमसिंग यांनी म्हटलंय. केवळ एका चुकीसाठी मुलांना फासावर चढवणे योग्य नसून समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास आपण कायद्यात योग्य ते बदल करून बलात्कार प्रकरणातील व्यक्तींची शिक्षा सौम्य करू, असे मुलायमसिंग यांनी धक्कादायकपणे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली.