1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. वाराणसीत भाजपची गुंडगिरी- केजरीवाल

वाराणसीत भाजपची गुंडगिरी- केजरीवाल

भारतीय जनता पक्षाने(भाजप) मतांसाठी वाराणसीत गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज (मंगळवार) केला आहे. 'आप' कार्यकर्त्याला सोमवारी झालेल्या मारहाण प्रकरणी केजरीवाल बोलत होते.
 
केजरीवाल म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. आजपर्यंत भाजपकडून माझ्यावर हल्ला होत होता. परंतु, आता त्यांनी 'आम आदमी'लाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरू आहे. त्यामुळे मतदार संघातील मतदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून देशाच्या लोकशाहीवरच घाला घालण्यात येत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती लक्षात घेऊन सैन्य दलाल पाचारण करावे, अशी मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.