दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या हस्त नक्षत्रावर दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात होते. यादिवशी पहाटे दख्खनचा राजा जोतिबाचा महाअभिषेक केला जातो. महावस्त्र आणि अलंकाराने दख्खनच्या राजाची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते.
साधारण दुपारच्या वेळी राजाच्या यात्रेला सुरवात होते. या दख्खनचा राजा जोतिबाचे पवित्र स्थान कोल्हापुर जिल्ह्यात आहे. वाडी रत्नागिरी स्थित श्री क्षेत्र ज्योतिबा तीर्थक्षेत्र यात्रेनिमित्त भक्तीउत्साहाने भरून जाते. यावर्षी ही यात्रा 12 एप्रिल म्हणजेच चैत्र पौर्णिमा पासून सुरु होते आहे. तसेच महारष्ट्रसोबत इतर राज्यातील भक्त सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये भक्त 'ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करून गुलाल उधळतात. तसेच दख्खनचा राजा जोतिबाच्या डोंगरावर तीर्थयात्रेचा उत्साह अनुभवास मिळतो. सनई चौघडे वाजवून हा सण का साजरा केला जातो.
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेबद्दल पौराणिक कथा
पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मीने कोल्हासुर राक्षसाचा युद्धात पराभव करून त्याला शेवटची इच्छा विचारली. त्यानंतर देवी महालक्ष्मी कोल्हापुरात स्थानपन्न झाली. त्यावेळी देवीने चार दिशांना चार रक्षक नेमले. तेव्हा ज्योतिबा यांना आई अंबाबाईने दक्षिण दिशेला रक्षक म्हणून निवडले. त्यादिवसापासून ज्योतिबा हे दक्षिण दिशेला असून रक्षण करतात. मान्यतेनुसार, दख्खनचा राजा ज्योतिबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात.
चैत्र पौर्णिमेला यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्योतिबा देवाची पालखी होय. सर्वत्र गुलाल उधळला जातो. यासोबतच मुख्य आकर्षण असे की यात्रेदरम्यान सजवलेल्या सासन काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. भक्त ज्योतिबाच्या नावाने 'चांगभल' म्हणत जयघोष करतात. तसेच दख्खनचा राजा जोतिबा हे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. भक्तांच्या या मंदिरात सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त मंदिरात येऊन नवस पूर्ण करतात. व ज्योतिबाच्या नावानं 'चांगभल, म्हणत जयघोष करतात.
Edited By- Dhanashri Naik