कृती : सर्वप्रथम सफरचंदाला सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. नारळाच्या दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून त्याचा घोळ तयार करावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, लवंगा, तेजपान, वेलची व जिऱ्याची फोडणी घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा व हिरवी मिरची, नारळाचे दूध व कापलेले सफरचंदाचे तुकडे घालून 5 मिनिट शिजवावे. गरम गरम एपल स्ट्यू तयार आहे. याला भात किंवा पुलाव सोबत खायला पाहिजे.