गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

कोबीची भजी

कोबीची भजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
MHNEWS
साहित्य : अर्धा किलो कोबी, पाच - सहा हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, पाव चमचा सोडा, पाव किलो तेल, पाव किलो बेसन, (तेल आणि बेसन गरजेनुसार कमी -जास्त होऊ शकतं) चवीनुसार मीठ, थोडी कोथिंबीर.

कृती :- कोबी बारीक चिरुन घ्या. त्यात आलं, कोथिंबीर, मिरच्या बारीक चिरुन टाका. या सगळ्याला मीठ लावा आणि पाच मिनिटं तसंच ठेवा. या मिश्रणाला पाणी सुटेल. आता त्यात मावेल तितके बेसन मिसळा. थोडा सोडा घालून सगळं मिश्रण एकजीव करा. थोडा तेलाचा हात लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा. हातावर जरा दाबून ते चपटे करा आणि गरम तेलात तळून घ्या. पुदीन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यास द्या.