तांदूळ व उडदाच्या डाळीची आंबोळी
|
कृती : तांदूळ व डाळीची भरड घेऊन त्यात थोडी मेथीची व सुंठीची पूड व मोहरीची डाळ, गरम पाणी व मीठ घालून पीठ थलथलीत कालवावे व रात्रभर गरम जागी ठेवावे. सकाळी त्यात सोडा, मिरची, कोथिंबीर टाकू चांगले फेटून घ्यावे. नंतर जाड लोखंडी तव्यावर तेल टाकून अंदाजे पाव इंच जाडीचे पीठ टाकून आंबोळी करावी या आंबोळीत चांगली जाळी पडते.

