साहित्य : 1 1 /2 कप तूर डाळ धुतलेली, 7 कप पाणी, 1 छोटा चमचा हळद, मीठ अंदाजे, 1 मोठा चमचा लाल मरची पूड, 1 1/2 धणे पूड, थोडासा गूळ किसलेला, 1 टोमॅटो कापलेला, 5 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, 7 कोकम धुतलेले, 2 मोठे चमचे कोथिंबीर कापलेली.
फोडणीचे साहित्य : 2 मोठे चमचे तेल, 1 छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे, 2 अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, 1 काडी कढी पत्ता, हिंग चिमूटभर.
कृती : कुकरमध्ये 4 कप पाणी घाला. तूर डाळ, हळद, आणि मीठ घाला. एकदा ढवळा व 5 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर कुकर उघडून डाळ चांगली एकजीव करा. नंतर त्यात 3 कप पाणी आणि फोडणी फोडणी शिवाय सर्व साहित्य टाका. चांगली उकळी येऊ द्या. व 5 मिनिटे शिजवा.
फोडणी तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. तडतडताच लाल मिरच्या, कढी पत्ता आणि हिंग घाला. काही सेकंद ढवळा आणि डाळीवर ओता. गरम गरम भाता सोबत किंवा पोळी बरोबर वाढा.