कृती : पनीर किसून त्यात मैदा मिसळावा. चिमटीभर मीठ घालून त्याचे लहान लहान गोळे तयार करावे. तळण्यासाठी तेल चांगले गरम करावे व त्यात गोळे तळून घ्यावे. 2 वाटी पाण्यात पालकाला चांगले उकळून घ्यावे. नंतर पाणी काढून पालकाची मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घ्यावी. कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, धने पूड, हळद यांची पेस्ट करावी.
एका कढईत 2 चमचे तेल घालून कांदे टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्यावी. नंतर त्यात पालकची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. वेगळे काढलेले पालकाचे पाणी व मीठ त्यात घालून उकळी आणावी. आता त्यात पनीरचे गोळे, तुप व साय घालून एक उकळी आणावी. पौष्टिक कोफ्ते बिरयानी सोबत फारच स्वादिष्ट लागतात.