बुधवार, 7 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद
Written By वेबदुनिया|

भुट्टा समोसा

भुट्टा समोसा पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 1/2 कप मैदा, 1 वाटी भुट्ट्याचे दाणे, 200 ग्रॅम बटाटे उकळलेले,1 चमचा धने पूड , दीड मोठे चमचे तेल, पुदिना, 1 लहान चमचा धने, 1 लहाना चमचा जिरे पूड, 1/2 गरम मसाला, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा आमचूर, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती : मैद्यात 1 चमचा मोहन घालून पाण्याने भिजवावे. भुट्ट्याचे दाणे उकळून वाटून घ्यावे. बटाटे उकळून चांगले एकजीव करून त्यात वाटलेले दाणे घालावे. 1/2 चमचा तेल गरम करून त्यात धने पूड व अख्खे धने घालावे, बदामी झाल्यावर त्यात बाकी सर्व साहित्य, बटाटे व भुट्ट्याचे मिश्रण घालून एकजीव करून करावे. मैद्याच्या लहान लहान गोळे करून पोळी प्रमाणे लाटाव्या व त्याचे 2 भाग करावे. प्रत्येकी अर्ध्या भागात मिश्रण भरून समोसेचा आकार द्यावा, तेल गरम करून मध्यम आचेवर समोसे तळून घ्यावे. चटणीसोबत सर्व्ह करावे.