मुगाच्या डाळीचा ढोकळा
- स्मिता
|
कृती : मुगाची डाळ सकाळी भिजत घालावी. दुपारी जरा जाडसर वाटावी, आले, लसूण, मिरच्या, मीठ व साखर हे सर्व एकत्र वाटून त्यात लिंबू पिळावे. सारखे करून तो वाटलेला गोळा वाटलेल्या डाळीमध्ये घालावा. त्यात एक चमचा तेल व दोन चमचे पाणी घालून ते सर्व फेसावे व नंतर त्यात सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घालून हाताने पुन्हा चांगले फेसावे म्हणजे ते फुगून वर येईल.
मोदकपात्रात पाणी उकळावयास ठेवावे. एक थाळी घेऊन तिला तेलाचा हात लावून ठेवावा. लगेच ते पीठ थाळीत ओतून ती थाळी पाणी उकळत असलेल्या मोदकपात्रात ठेवावी व लेगच वर झाकण घालावे. ढोकळा तयार होण्यास अंदाजे दहा-पंधरा मिनिटे लागतील. तयार झाल्यावर काढून घेऊन त्यावर खोबरे, कोथिंबीर व फोडणी घालावी व गार झाल्यावर तुकडे पाडावेत. फोडणीत हळद घालू नये.
