1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

राजगिर्‍याच्या पीठाची शंकरपाळी

राजगिरा पीठ
ND
साहित्य : 3 वाटी राजगिरा पीठ, पाऊण वाटी गूळ बारीक चिरलेला, 2 लहान चमचे तुपाचे मोहन, तळण्यासाठी तेल किंवा तूप आवडीनुसार.
कृती : थोड्या पाण्यात गूळ भिजवून ठेवा. राजगिर्‍याचे पीठ चाळून घ्या, कडकडीत तुपाचे मोहन घाला. चांगले मिसळून घ्या. वरील भिजवलेल्या गुळाचे पाणी घाला, हलवून चांगले मिसळून पीठ मळून घ्या. घट्ट वाटल्यास तोडे पाणी लावा. घट्ट गोळा करून पोळपाटावर राजगिर्‍याचे पीठ पसरवून पोळी लाटून घ्या, चाकूने चौकोनी काप पाडा. कढईत गरम तेलावर शंकरपाळी तळून घ्या. खुसखुशीत शंकरपाळे मुलांना खूप आवडतील.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा