साहित्य : 1 वाटी शिंगाड्याचे पीठ, 1 मोठा चमचा दाण्याचा कूट, मध्यम आकाराचा बटाटा मॅश केलेला, 4-5 हिरव्या मिरच्या, जीर पूड, 1/2 चमचा तिखट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल.
कृती : सर्वप्रथम शिंगाड्याचे पीठ चाळून घ्यावे, नंतर त्यात मॅश केलेला बटाटा, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, जिरं आणि कोथिंबीर घालून त्याची पेस्ट तयार करावी. नंतर तेल गरम करून त्या मिश्रणाचे गरम गरम भजी तळून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा