गुरू माहत्म्य
तुम्ही खरंच किती महान आहात
वेगवेगळ्या विचारांचं, कल्पनांचं, भावनांचं
स्वतंत्र विश्व आहात
खरंच गुरुजन हो तुम्ही किती महान आहात ।।1।।
विद्यार्थ्यांच्या जीवनात सांस्कृतिक चळवळ
निर्माण करणारे निर्माते आहात ।।2।।
सांस्कृतिक विचारांना दिशा देणारे
सुदर्शन चक्र आहात ।।3।।
अनेकांना एकतेत गुंफणारं
आमच्या देहातील हृदय आहात ।।4।।
जीवनांच तत्त्वज्ञान सांगणारी
अमृताची धार आहात ।।5।।
हाती घेतलेलं कार्य कृतीत उतरवणारे
थोर आदर्श आहात।।6।।
बालकांच्या मनावर संस्काराचं सुंदर चित्र
रेखाटणारे चित्रकार आहात ।।7।।
बहणार्या, फुलणार्या बालमनाच्या
साम्राज्यातील वसंत आहात ।।8।।
निराधारांना, गरजवंतांना आधार देणारे
दानशूर कर्ण आहात ।।9।।
जीवनाच्या या सहप्रवासात आशेचा दीप
प्रज्वलित करणारे स्वयंप्रकाशित दीपक आहात ।।10।।
संजय भालेराव