गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:03 IST)

प्रबोधिनी एकादशीला तुळशीची हे 8 पवित्र नावे जपा

आपल्या सर्वांच्या घरा घरात राहणाऱ्या तुळसच्या 8 नावांचे मंत्र उच्चारून किंवा एकादशीच्या दिवशी याचे जाप करुन भगवान विष्णूंसह आई लक्ष्मी देखील प्रसन्न होते.
 
मंत्र - 
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी।।
एतनामाष्टकं चैव स्रोतं नामर्थं संयुक्तम। य: पठेत तां च सम्पूज् सौऽश्रमेघ फललंमेता।।
 
तुळशीची 8 नावे - पुष्पसारा, नंदिनी, वृंदा, वृंदावनी, विश्वपुजिता, विश्वपावनी, तुळशी आणि कृष्ण जीवनी.
 
तुळशीच्या पूजेत हे साहित्य ठेवणे आवश्यक आहे -
तुळशीच्या पूजेत तूप, निरांजनी, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य आणि फुले अर्पण करतात. दररोज तुळशीची पूजा केल्याने घराचे वातावरण पूर्णपणे शुद्ध राहील. या झाडात अनेक घटक असे असतात ज्यामुळे जंत अजिबात जवळ येत नाही. स्वतः नारायण श्री हरी तुळशीला आपल्या डोक्यावर घालतात. ही मोक्षदायिनी आहे. म्हणून देवाच्या पूजेत, आणि नैवेद्यात तुळशीची पाने असणे महत्त्वाचे आहे.