शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (12:14 IST)

महालक्ष्मी व्रत विशेष : अष्टलक्ष्मी कोण आहेत, चला माहिती जाणून घेऊ या....

देवी लक्ष्मीचे 8 अवतार सांगितले आहेत : महालक्ष्मी, ज्या वैकुंठात वास्तव्यास आहे. स्वर्गलक्ष्मी, ज्या स्वर्गात वास्तव्यास आहे. राधा, ज्या गोलोकात वास्तव्यास आहे. दक्षिणा, ज्या यज्ञात वास्तव्यास आहे. गृहलक्ष्मी ज्या घरात वास्तव्यास आहे. शोभा, जी प्रत्येक वस्तू मध्ये वास्तव्यास आहे. सुरभी (रुक्मणी), ज्या गोलोकात वास्तव्यास आहे आणि राजलक्ष्मी (सीता), ज्या पाताळात आणि भूलोकात वास्तव्यास आहे. 
 
1 आदिलक्ष्मी : आदी लक्ष्मीलाच महालक्ष्मी म्हणतात ह्या ऋषी भृगु यांचा कन्या आहेत.
 
2 धनलक्ष्मी : असे म्हणतात की एकदा भगवान श्री विष्णूंनी कुबेर कडून उसणे घेतले असे ज्याला ते वेळेवर देऊ शकले नाही, तेव्हा धनलक्ष्मीनेच विष्णूजींना कर्जमुक्त करविले.
 
3 धान्यलक्ष्मी : धान्य म्हणजे धान्य जसे की तांदूळ. या व्यक्तींच्या घरात धान्य देतात.
 
4 गजलक्ष्मी : प्राणी धन देणगी म्हणून देणाऱ्या देवीला गजलक्ष्मी म्हणतात. प्राणींमध्ये हत्तीला राजसी मानले गेले आहेत. गजलक्ष्मीने देवराज इंद्र यांना समुद्राच्या खोल तळात हरवलेली त्यांची संपत्ती शोधण्यास मदत केली होती. गजलक्ष्मीचे वाहन पांढरे हत्ती आहे.
 
5 संतानं लक्ष्मी : अपत्य देणारी देवी संतानलक्ष्मीचे हे रूप मुलांना आणि आपल्या भाविकांना दीर्घायुष्य देण्यासाठीचे आहे. संतानलक्ष्मीचे हे रूप एका मुलाला कडेवर घेऊन दोन माठ, एक तलवार आणि एक ढाळ घेऊन सहा शस्त्रे असे दिसते. इतर हात अभयमुद्रेत दर्शविले असे. 
 
6 वीर लक्ष्मी : ही लक्ष्मी आयुष्यातील संघर्षावर विजय मिळविण्यासाठी आणि युद्धात आपले शौर्य दाखविण्यास सामर्थ्य देते.
 
7 विजयलक्ष्मी किंवा जयालक्ष्मी : विजय ज्याचा अर्थ आहे जिंकणे. विजय किंवा जयालक्ष्मी ही विजयाची प्रतीक आहे. त्या एक लाल साडी नेसून एका कमळावर बसलेल्या, आठ शस्त्र धरून दर्शविलेल्या आहेत.
 
8 विद्या लक्ष्मी : विद्या म्हणजे शिक्षणाच्या बरोबर ज्ञान. देवीचे हे रूप आम्हाला ज्ञान, कला आणि विज्ञानाची शिक्षा देते विद्याच्या या लक्ष्मीला कमळावर वसलेले दर्शविले आहेत ज्यांचे चार हात आहेत. पांढरी साडी नेसलेल्या या लक्ष्मीच्या दोन्ही हातात कमळ घेतलेले आहेत आणि इतर दोन्ही हात अभय आणि वरदा मुद्रांमध्ये आहे.