शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2024 (23:41 IST)

भानु सप्तमी व्रत कथा

भानू सप्तमी सणाविषयीच्या प्रचलित आख्यायिकेनुसार, एकेकाळी इंदुमती नावाची एक वेश्या राहायची. वेश्याव्यवसायात अडकल्यामुळे तिने आयुष्यात कोणतेही धार्मिक कार्य केले नव्हते. एके दिवशी तिने वशिष्ठ ऋषींना विचारले – ऋषी श्रेष्ठ! मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणतेही पुण्य कार्य केलेले नाही, परंतु मृत्यूनंतर मला मोक्ष प्राप्त व्हावा हीच माझी इच्छा! जर माझ्यासाठी मोक्षप्राप्तीसाठी काही मार्ग असेल तर तो उपाय सांगा, ऋषिवर.
 
इंदुमतीची ही विनंती ऐकून ऋषी वशिष्ठांनी भानु सप्तमीचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की एकच व्रत आहे जे स्त्रियांना सुख, सौभाग्य, सौंदर्य आणि मोक्ष प्रदान करते, भानु सप्तमी किंवा अचला सप्तमी. जी स्त्री या सप्तमी तिथीचे व्रत करून सूर्यदेवाची पूजा विधीनुसार करते, तिला तिच्या इच्छेनुसार पुण्य प्राप्त होते.
 
वशिष्ठजी पुढे म्हणाले - जर तुम्हाला या जन्मानंतर मोक्ष मिळवायचा असेल तर तुम्ही हे व्रत पाळले पाहिजे आणि खऱ्या मनाने पूजा केली पाहिजे. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. वशिष्ठ ऋषींकडून भानू सप्तमीचे माहात्म्य ऐकून इंदुमतीने हे व्रत पाळले, ज्याचे फलित म्हणून प्राणत्याग केल्यावर तिला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळाली आणि इंदुमतीला स्वर्गातील अप्सरांची नायिका झाली. याच श्रद्धेच्या आधारावर आजही लोक हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळतात.