Hartalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे ५ काम, जाणून घ्या धार्मिक मान्यता
हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. यंदा हरितालिका १४ सप्टेंबर २०२६ सोमवार रोजी साजरी केली जात आहे. कुमारिका मनपसंत जीवनसाथीदार मिळवा तर सुवासिनी नवर्याच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिका हे व्रत करतात. हे व्रत कसे करायचे याची पूजा विधी तर माहीत असेलच परंतू या व्रताचे काही नियम आहे हे पाळणे आवश्यक आहे तरच व्रताचे फळ मिळतं. तर येथे आज आपण जाणून घ्या असे ५ काम जी हरितालिका व्रत दरम्यान चुकून करू नये.
राग करू नये
व्रत करणार्यांना स्त्रियांनी क्रोध करू नये. स्त्रिया हाताला मेंदी लावतात त्यामागे क्रोधावर ताबा असला पाहिजे हे ही एक कारण आहे.
झोपू नये
तसेही कोणत्याही व्रताच्या दिवशी दिवसा झोपणे चुकीचे आहे तसेच हरितालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणार्या स्त्रियांनी रात्री झोपू नये. जागरण करून भजन कीर्तन किंवा काही मनोरंजक खेळ खेळत जागरण करावे.
कोणाचाही अपमान करू नये
चुकून ही घरातील वडीलधार्यांना अपशब्द बोलू नये. त्यांचा अपमान करू नये याने व्रताचे फळ मिळत नाही. तसेही पूजे पूर्वी वडीलधार्यांच्या आशीर्वाद घेऊन पूजा केली जाते. अशात त्यांचा अपमान मुळीच करू नये.
अन्नाचे सेवन करू नये
हरितालिका हे व्रत निर्जल केलं जातं. या कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाही अशात अन्न ग्रहण करणे अत्यंत चुकीचे ठरेल. काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यास फलाहार करता येऊ शकतो परंतू अन्न खाऊ नये.
काळ्या किंवा गडद रंगाच्या कपड्यांचा वापर करू नये
मान्यता: हे व्रत सौभाग्याचे प्रतीक मानले जात असल्याने पूजेच्या वेळी काळे किंवा जास्त गडद/निराशाजनक रंगाचे कपडे घालणे टाळावे.
योग्य पर्याय: पूजेसाठी लाल, हिरवा, पिवळा, किंवा नारंगी यांसारख्या शुभ आणि मंगलकारक रंगाचे कपडे परिधान करावेत.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit

