बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (16:48 IST)

भीमाने द्रौपदीची 7 वेळा केली होती मदत जाणून घेऊ या ही माहिती ...

भीम हे द्रौपदीवर सर्वात जास्त प्रेम करायचे आणि त्यांनी द्रौपदीला पदोपदी साथ दिले. तसेच ते द्रौपदीची प्रत्येक इच्छा पूर्ण करायचे. तसं तर भीमाने द्रौपदीला बऱ्याच ठिकाणी मदत केली, पण आपण इथे काही 7 घटनांचे वर्णन करीत आहोत.
 
1 भीमाने कुबेराच्या अप्रतिम अश्या बागेतून द्रौपदीसाठी सुवासिकफुले आणली .
 
2 भीमाने मत्स्य वंशाचे राजा कीचक याला ठार मारले कारण त्यांनी द्रौपदीसह अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर कीचकच्या भावांना हे कळल्यावर त्यांनी द्रौपदीस स्मशान भूमीत चितेच्या अग्नीत जाळण्यासाठी बांधून दिले पण भीमाने एकट्यानेच लढा देऊन द्रौपदीचे प्राण वाचविले.
 
3 वनवासाच्या दरम्यान घनदाट अरण्यात भीम द्रौपदीला आपल्या हातावर उचलून चालत असे, त्यामुळे त्यांना चालण्याचा त्रास होऊ नये.
 
4 भीमानेच द्रौपदीच्या वस्त्रहरणानंतर 100 कौरवांना संपविण्याचे आश्वासन दिले असे आणि त्यांची कौरवांना ठार मारून आपल्या दिलेल्या वचनाची पूर्णता केली.
 
5 अज्ञातवासाच्या दरम्यान जेव्हा द्रौपदीला राणी सुदेष्णाची दासी बनावे लागले तर भीमाला याचा फार त्रास झाला आणि ते प्रत्येक क्षणी द्रौपदीची काळजी घ्यायचे.
 
6 महाभारताच्या युद्धाच्या 14 व्या दिवशी भीमाने द्रौपदीचे वस्त्रहरण करणाऱ्या दुःशासनाच्या छातीचे रक्त द्रौपदीस केस धुण्यासाठी नेऊन दिले होते. त्यानंतर द्रौपदीने आपले केस पुन्हा बांधले.
 
7 स्वर्गात जात असताना भीमाने द्रौपदीस बऱ्याच वेळा चालण्यात मदत केली. या वेळी जेव्हा द्रौपदीला सरस्वती नदीला ओलांडताना त्रास होत होता तेव्हा भीमाने एका मोठ्या खडकाला नदीच्या मध्यभागी ठेवले ज्यावरून चालत द्रौपदीने नदी ओलांडली. तो खडक आजतायगत देखील भीम पूल म्हणून प्रख्यात आहे.