गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (08:37 IST)

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

ganpati
गणेश आणि बुधवार यांच्यात काय संबंध जाणून घ्या
 
बुधवारचा दिवस प्रथम पूजनीय प्रभू श्री गणेश यांच्याव्यतिरिक्त बुध ग्रहाला समर्पित आहे. बुधवारी गणपतीची पूजा केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. म्हणूनच या दिवशी काही उपाय केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते.
 
सनातन धर्मांप्रमाणे प्रत्येक दिवस कोणत्या न कोणत्या देवाला समर्पित आहे. अशात बुधवार हा दिवश गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात. तर जाणून घ्या बुधवार आणि गणपती यांच्यात काय संबंध आहे ते- 
 
पौराणिक कथेनुसार जेव्हा माता पार्वतीने कैलासावर आपल्या हाताने भगवान गणेशाची निर्मिती केली त्या दिवशी बुधवार हा वार होता. अशात गणपतीची पूजा करण्यासाठी बुधवार श्रेष्ठ दिवस मानला गेला.
 
या कारणामुळे देखील गणपतीला प्रिय आहे बुधवार
बुधवारला सौम्यवार देखील म्हणतात. तर गणपती सौम्यतेसाठी प्रिय आहे. यामुळे बुधवारी गणपती पूजेचं महत्त्व आहे. बुधवार अनेक कारणांमुळे शुभ दिवस मानला गेला आहे. कोणतेही नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा दिवस अनुकूल ठरेल. या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना केल्याने सुख-सौभाग्य वाढतं आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
 
या उपायांनी मिळेल इच्छित फळ
गणपतीला मूगाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. असे सात बुधवार करावं. याने मनोइच्छित फळ प्राप्ती होते. आणि बुध ग्रहाचा दोष देखील नाहीसा होतो. सोबत आपण पूजनमध्ये 11 किंवा 21 दुर्वाजोड अर्पित कराव्या अशाने गणपतीची सदैव कृपा राहते.
 
बुधवारी किन्नरांना हिरवे वस्त्र दान करावे. मंदिरात जाऊन किंवा गरजूंना हिरवी मूग डाळ दान करावी. अशाने कुंडलीमध्ये बुध ग्रह मजूबत होतो आणि आरोग्यसंबंधी समस्यांपासून मुक्ती मिळते. बुधवारी या गोष्टींचे दान करणे फलदायी ठरतं.
 
नारद पुराणानुसार बुधवारी गणेश चालीसा किंवा गणेश स्त्रोताचे 11 वेळा पण केल्याने घरात सुख-शांती राहते. आणि करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी गायीला हिरवी गवत खाऊ घालावी. अशाने प्रगती होते.