बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (22:45 IST)

देव घरात अधिक देव असल्यास त्यांचे विसर्जन करावं का? जास्त तसबीरींचे काय करावं ?

काही लोकं देवघरातील देव उगाच वाढवीत असतात. कुठे तीर्थक्षेत्री गेले की तिथले फोटो वा मूर्ती आणून लगेच देवघरात ठेवतील! याचा परिणाम असा होतो की, पुढे पुढे वयोमानानुसार वाढलेल्या देवांची पूजा करणे जमत नाही. या साठीच देव वाढवतानाच विचार करावा. 
 
थोडे देव असतील तर त्यांची पूजा नीट होते. म्हणून देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा अधिक मूर्ती असल्यास फक्त एकच मूर्ती ठेवावी व बाकीच्यांचे गुरुजींकडून शास्त्रोक्त विसर्जन करून घ्यावे. 
 
यात देवाचा कोप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण मूर्तीप्रमाणे तसबीरीची प्राण प्रतिष्ठा झालेली नसते. या साठी तसबीरी कमी करताना त्या त्या दैवतांची क्षमा मागावी व त्यांना नैवेद्य दाखवून आरती करावी व जास्तीच्या तसबीरी काढून ठेवाव्यात. यात कसलाही दोष लागत नाही.