बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

संध्या कशी करावी

Sandhya Vandana संध्या वंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे. या उपासनेची सुरुवात उपनयन संस्कार यानंतर केली जाते. प्रतिदिन प्रातःकाळ, माध्यान काळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना करण्याची पद्धत असते. अर्घ्यदान, गायत्री मंत्र जप व उपस्थान ही संध्येतील मुख्य कर्मे आहेत. संध्या वंदना यात गायत्री देवी, सूर्य, अग्नी, वरुण इतर. देवांची उपासना केली जाते.
 
संध्या उपासना करण्याची विधी
सकाळी स्नान झाल्यानंतर पूर्वेकडे तोंड करून बसावे.
 
आचमन -
पुढील तीन मंत्राने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे
ॐ केशवाय नमः स्वाहा।। ॐ नारायणाय नमः स्वाहा।। ॐ माधवाय नमः स्वाहा।।
 
हस्त प्रक्षालन -
पुढील दोन मंत्राने पळीभर पाणी हातावरुन ताम्हणात सोडावे
ॐ गोविंदाय नमः।। ॐ विष्णवे नमः।।
 
हात जोडून विष्णूंची पुढील नावे घ्यावीत -
ॐ मधुसूदनाय नमः।। ॐ त्रिविक्रमाय नमः।। ॐ वामनाय नमः।। ॐ श्रीधराय नमः।। ॐ हृषीकेशाय नमः।। ॐ पद्मनाभाय नमः।। ॐ दामोदराय नमः।। ॐ संकर्षणाय नमः।। ॐ वासुदेवाय नमः।। ॐ प्रद्युम्नाय नमः।। ॐ अनिरुध्दाय नमः।। ॐ पुरूषोत्तमाय नमः।। ॐ अधोक्षजाय नमः।। ॐ नरसिंहाय नमः।। ॐ अच्युताय नमः।। ॐ जनार्दनाय नमः।। ॐ उपेंद्राय नमः।। ॐ हरये नमः।। ॐ श्रीकृष्ण परमात्मने नमः।।
 
प्राणायाम -
उजव्या हाताचा अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे याला पुरक असे म्हणतात. पाची बोटाने नाक बंद करून घेतलेला श्वास स्थिर करणे याला कुंभक असे म्हणतात. तर उजव्या नाकपुडी वरील अंगठा काढून उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडणे याला रेचक असे म्हणतात. अशाप्रकारे प्राणायाम करावा. 
 
मार्जन -
प्राणायामानंतर सर्व पापांचा अगर वाईट वासनांचा क्षय व्हावा म्हणून उदकाने मार्जन करावे अर्थात अंगावर पाणी शिंपडावे. उदक पापांचा नाश करते. मार्जनात तांब्याच्या पात्रातील पाण्यात कुशाच्या काडया बुडवून ते पाणी अंगावर शिंपडावे. पाणी डाव्या हातात घेऊन उजव्या हातात घेतलेल्या दर्भाने ते पाणी मस्तकावर आणि अंगावर शिंपडणे, अशा प्रकारेही मार्जनक्रिया केली जाते. अघमर्षण म्हणजे पाप बाहेर टाकणे. 
 
अर्घ्यदान - अर्घ्यदान म्हणजे सूर्याला आदराने पाणी अर्पण करणे. दोन्ही हातांच्या ओंजळीत पाणी घेऊन गायत्री मंत्राचा जप करून ते पाणी सूर्य-सन्मुख होऊन तीन वेळा खाली सोडायचे. 
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही।। धियोयोन: प्रचोदयात।। ॐ
प्रातःसंध्या ब्रम्ह स्वरुपिने सूर्यनारायणाय नमः इदं अर्घ्यं दत्तं न मम।।
असे तीन अर्घ्य द्यावेत.
 
आसन आणि न्यास - 
आसनविधी, न्यास म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांत देवतांची भावना करून त्या त्या अवयवांना स्पर्श करणे. 
 
गायत्रीध्यान - 
गायत्री म्हणतांना दोन्ही हात वर सूर्याकडे करावे, तत सवितुर त्यस्य सविता देवता गायत्री छंद: सवितृ सूर्यनारायण देवत: गायत्री जपे विनियोगा
 
गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा, २८ वेळा किंवा किमान १० वेळा तरी करावा.
ॐ भू: ॐ भुव: ॐ स्व: ॐ मह: ॐ जन: ॐ तप: ॐ सत्यंम।। ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही।। धियोयोन: प्रचोदयात।। ॐ आपोज्योती रसोंमृतं।। ॐ ब्रम्ह भूर्भुव: स्वरोम।।
 
जप झाल्यानंतर अनेन यथाशक्ति गायत्री जपाख्येन कर्मणा श्री भगवान सविता सूर्यनारायणः प्रियतां न मम।।
 
उपस्थान - 
सूर्य, अग्नी, यज्ञपती व दशदिशा इत्यादींच्या प्रार्थना करून संध्येच्या अखेरीस स्वत:भोवती फिरून दाही दिशांना नमस्कार करायचा असतो. 
 
आपल्या हातून घडलेल्या पातकांचा नाश व्हावा आणि आपल्यावर ईश्वराची कृपा व्हावी, हे संध्यावंदनाचे हेतू सांगितले जातात.