बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

thursday vishnu
Vishnu puja on thursday गुरुवार हा दिवस गुरु दोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार गुरु बृहस्पती, देवगुरु आहे. ज्योतिष मान्यतेनुसार देखील गुरु सुखद दांपत्य जीवन व सौभाग्य निर्धारित करतं. विशेषकरून स्त्री विवाह आणि पुरुषांच्या आजीविका समस्या गुरुला प्रसन्न केल्याने दूर होते.
 
देवगुरु बृहस्पती (गुरु) धनू आणि मीन रास यांचा स्वामी ग्रह आहे. साधारणता गुरु शुभ फल प्रदान करतं परंतू पापी ग्रह त्यासोबत विराजित असल्यास किंवा गुरु आपल्या नीच राशीत स्थित असल्यास गुरु जातकासाठी अनिष्टकारी होऊन जातो अर्थात अशुभ फल देऊ लागतं ज्यामुळे जातक आर्थिक, मानसिक, शारीरिक व कौटुंबिक रूपाने परेशान होतो.
 
गुरुवारी प्रभू विष्णूंची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी विधी-विधानाने पूजन केल्याने गुरु ग्रह शांत राहतं.
 
तर जर आपण आर्थिक अडचणींना सामोरा जात असाल तर
कुठलेही काम केले तरी अपयश हाती लागत असल्यास काही उपाय आहेत ज्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
ज्योतिष शास्त्र प्रमाणे गुरु धनाच कारक ग्रह आहे. ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा होते त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहते.
 
गुरुवारी या प्रकारे करा पूजा
गुरुवारी ब्रह्म मुहूर्तात उठून सर्व कामातून निवृत्त होऊन देवाची आराधना करावी. 
नंतर तुपाचा दिवा लावून प्रभू विष्णूंची पूजा करावी.
विधी-विधानपूर्वक पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ नक्की करावा.
भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर केशराने तिलक लावावे. केशर नसल्यास हळदीचे तिलक देखील करू शकता. 
या दिवशी कोणाला पैसे किंवा उधार देणे टाळावे. अशाने गुरु कमजोर होऊ शकतो आणि गुरु कमजोर असल्यास आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतो. 
गुरुवारी आई-वडील आणि गुरुंचा आशीर्वाद घ्यावा. यांचा आशीर्वाद म्हणजे गुरु ग्रहाचा आशीर्वाद मानला जातो. 
या दिवशी आनंदी राहण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र भेट करावे.
संध्याकाळी केळीच्या झाडाखाली दिवा लावून लाडू किंवा बेसनाच्या मिठाईचं नैवेद्य दाखवावे आणि प्रसाद वाटावा. 
 
तसेच दांपत्य जीवनात समस्या उत्पन्न होत असल्यास किंवा प्रेमाची कमी जाणवतं असल्यास या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी पूजन नक्की करावे. यांची कृपा मिळाल्याने जीवन आनंदी होईल. गुरु कमजोर असल्यामुळे धनाची कमी किंवा आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागत असल्यास या दिवशी काही कामं असे आहेत जी टाळणे योग्य ठरेल.
 
गुरुवारी बायकांनी केस धुऊ नये. असे केल्याने संतानासाठी कष्टकारी ठरतं.
गुरुवारी नखं कापू नये. 
तसेच गुरुवार हा दिवस रिक्त मानला गेला आहे म्हणून या दिवशी कुठलेही नवीन कार्य सुरू करू नये.
गुरुवाराला धर्माचा दिवस मानले गेले आहे म्हणून या दिवशी मांसाहार, दारू याचे सेवन टाळावे.
गुरुवारी जुने कपडे देखील धुऊ नये.