रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

माघी पौर्णिमा महत्त्व, जाणून घ्या काय दान करावे

माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गंगा स्नान आणि दान पुण्याचे अत्यंत महत्त्व आहे. गंगा स्नान शक्य नसल्यास एखाद्या पवित्र नदीत स्नान करावे. या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी प्रभू विष्णूंची पूजा करावी. नंतर पितरांचे श्राद्ध करून गरिबांना भोजन, वस्त्र, तीळ, कांबळे, गूळ, तूप, जोडे, फळं आणि अन्नाचे दान करावे.
 
या दिवशी सोनं आणि चांदीचे दान करणे देखील योग्य ठरेल. या दिवशी गो दानाचे विशेष फल प्राप्त होतं. या दिवशी संयमपूर्वक आचरण करून व्रत करावे. शक्य असल्यास एकावेळी फलाहार करावे.
 
या दिवशी अधिक जोराने बोलणे टाळावे. कोणावरही क्रोध करून नये. तसेच गृह क्लेशापासून वाचावे. गरीब आणि गरजू लोकांची मदत करावी.
 
आपल्या वाणी, मन, वचन आणि कर्मामुळे कोणाचाही अपमान होऊ नये याची काळजी घ्यावी. या प्रकारे वागल्याने व्रताची पुण्य प्राप्ती होते.
 
का खास आहे ही तिथी
 
माघी पौर्णिमेला देवता देखील स्वरूप बदलून गंगा स्नानासाठी प्रयाग येथे येतात असे मानले जाते. म्हणूनच या तिथीचे धर्म ग्रंथात विशेष महत्त्व आहे.
प्रयागराजमध्ये एक मास कल्पवास करणार्‍या भक्तांचे व्रत समापन या दिवशी होतं.
सर्व कल्पवासी माघी पौर्णिमेला गंगा नदीची आरती व पूजन करून साधू संत व ब्राह्मणांना भोजन घालतात. इतर सामुग्री दान करून गंगा नदीला पुन्हा बोलवण्याचे निवेदन करत आपल्या वाटेला निघून जातात.
माघ पौर्णिमेला ब्रह्म मुहूर्तात नदीत स्नान केल्याने सर्व आजार दूर होतात आणि या दिवशी तीळ व कांबळे वाटल्याने नरक लोकाहून मुक्ती मिळते असे मानले गेले आहेत.