1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (07:57 IST)

Pradosh Vrat 2024 मार्गशीष कृष्ण प्रदोष हे व्रत करण्याचे फायदे

Pradosh Vrat 2024 - एकादशीचे व्रत हे श्री हरी विष्णुंना समर्पित आहे. प्रत्येक त्रयोदशीला प्रदोष हे व्रत ठेवले जाते. मार्गशीष महिन्याचे प्रदोष व्रत हे ०९ जनवरी मंगलवार या दिवशी ठेवले जाईल. मंगलवारी येणारा हा प्रदोष म्हणजे मंगळ प्रदोष ठेवण्याचे खुप फायदे आहे.
 
प्रदोष व्रताचे मह्त्व - 
शास्त्रानुसार प्रदोष व्रत केल्याने चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्ती होते. 
या दिवशी श्री भगवान शिवांची आराधना केल्याने भक्तांचे सारे कष्ट दूर होतात आणि मोक्ष प्राप्ती होते.
 
मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने गत जीवनात केलेल्या सर्व पापांचा नाश होतो. पुराणानुसार एक प्रदोष व्रत केल्याने दोन गाई दान केल्याचे पुण्य मिळते. 
 
प्रदोष व्रत करण्याचे फायदे - 
१ . मंगळवारी आलेल्या प्रदोष व्रताने तसेच ते केल्याने कर्ज मुक्ती होते.
२ . प्रदोष व्रत केल्याने आरोग्यात सुधारणा होते. 
३ . नेहमी प्रदोष व्रत केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते.
४ . प्रदोष व्रत ठेवल्याने सर्व प्रकारचे चंद्र दोष दूर होतात. 
५ . मानसिक अशांती असेल तर प्रदोष व्रत केल्याने मानसिक शांती मिळते. 
६ . या व्रताला मनापासून केल्याने भाग्य उजळते.
७ . या व्रताने अशुभ संस्काराना नष्ट करता येऊ शकतं. 
८ . प्रदोष व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात कधीच संकट येत नाही आणि त्याच्या जीवनात धन आणि समृद्धी कायम राहते.