1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (17:22 IST)

Putrada Ekadashi 2024 : श्री हरि विष्णुंना पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा नैवेद्य अर्पण केल्यास पूजा यशस्वी होईल

putrada ekadashi
पुत्रदा एकादशी : सनातन धर्मात एकादशी तिथिचे विशेष महत्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. पौष महिन्याच्या शुक्लपक्ष एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून म्हटले जाते. यावेळेस पुत्रदा एकादशी 21 जानेवारी रोजी आहे या दिवशी जगाचे पालनहार भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचे महत्व आहे. अशी आख्यायिका आहे की एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. सोबतच संतानसुखाची प्राप्ती होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना काही विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवल्यास व्रत पूर्ण  होते. चला जाणून घेऊया की पौष पुत्रदा एकादशीला भगवान विष्णु यांना नैवेद्यात कुठल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा.
 
पौष पुत्रदा एकादशी या दिवशी विधिपूर्वक पूजा केल्यानंतर भगवान विष्णुंना खीरीचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवावे. लक्षात ठेवा की, एकादशीला तुळशीपत्र तोडणे वर्जित आहे. कारण माता लक्ष्मी या दिवशी निर्जला व्रत ठेवतात. त्यामुळे एकादशीच्या एक दिवस अगोदर तुळशीपत्र तोडून ठेवावे. 
 
भगवान विष्णु यांना केळ खूप प्रिय आहे एकादशीच्या नैवेद्यात केळाचा नैवेद्य जरूर दाखवा असे केल्याने  धनलाभ होतो यासोबतच नैवेद्यात मिठाई तसेच दुधाचा देखील नैवेद्य दाखवावा.असे केल्याने भगवान विष्णु प्रसन्न होतात नैवेद्य दाखवतांना या मंत्राचा ध्यान करावा. 

त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये।
गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।
 
या मंत्राचा अर्थ हा आहे की हे देवा जे पण काही माझ्या जवळ आहे ते आपणच दिलेले आहे. आपण जे दिलेले आहे तेच आम्ही तुम्हाला अर्पित करतो. कृपा करून माझ्या या नैवेद्याचा स्वीकार करावा.