Marathi Biodata Maker

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग १

Updated: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (12:33 IST)
॥ किमया रंजवो । नरू तो करावो । नारायणू-माया । किं-नु मया! ॥१८॥
 
३ अवतरणं
 
॥ मच्छिंदरू कवि । हरि नारायणू । नमूं जालंधरू । नारायणू ॥१९॥
॥ कानीफा तो नरू । चर्पटी पांचवा । षष्ठु नागनाथ । भर्तरी की ॥२०॥
॥ रेवणू अष्टमा । मवमा गहीना । नाथां जपू नऊ । नारायणू ॥२१॥
॥ नाथू पृथीवीसी । बीजें रूपें त्यासी । फेकी वीर्यू विधी । तयें ठायी ॥२२॥
॥ जडा सार्‍या जाति । विना जीवा जाणा । अन्तरी तो भरे पूर्णूकामू ॥२३॥
 
४ मच्छिंदर अवतार
 
॥ शिवानीसी मंत्रू । संजीवनी देतां । उकलितां नाथें । जीवां व्यापी ॥२४॥
॥ मच्छली जी नारी । यमुनेंच्या तीरी । पुत्र-लाभें नीरी । मंत्रे घेई ॥२५॥
॥ कामीक धीवरू । शारद्वता माथू । कवि नारायणू । पुत्रू तयां ॥२६॥
॥ मच्छिंदर नामें । संबोखिती बाळा । विद्या मीन-धातू । तातू देई ॥२७॥
॥ पुत्राते नावडे । जाइ काशीपुरी । केदारासी सोई । तेथोनिया ॥२८॥
॥ शिवा दत्ता नाथा । तपें तोषोनियां । शस्त्रास्त्रें विद्यया । पूर्णू होतू ॥२९॥
॥ कणींमंत्रू स्फुटू । संचारू करी तू । राजताती कानी । कुंडले ती ॥३०॥
॥ ऊर्ध्व-वातू सेवी । भास्करी नेत्रासी । एकाग्रे तापसी । सेवी पंथू ॥३१॥
 
५ माया मच्छिंदर
 
॥ जारणें मारणें । शापू निवारणें । देवां मोहवीणें । कानी स्फूटू ॥३२॥
॥ सप्तशृन्गी येई । अम्बा दर्शनार्थी । शाबरी मंत्रूनी । मनी पूजी ॥३३॥
॥ मार्तंडा नागासी । येतां सिद्ध देव । अष्टसिद्धी देत । वाळंगोनि ॥३४॥
॥ अज्ञानें नाशोनी । ग्रंथ बोधवोनी । शाबरी निर्मूनी । पंथें चाली ॥३५॥
॥ गोरक्षें तें ग्रंथी । गौडी । बंगालीये । रचीयेलें स्वयें । किमय तत्वू ॥३६॥
॥ मच्छिंद्रो पोचतां । बंगाली गौडीसी । चंद्रगिरी ग्रामी भिक्षेप्रती ॥३७॥
॥ नेमें धर्म पाळू । सर्वोपदयाळू । अलखो आंगणी । शद्ब देई ॥३८॥
॥ पुत्र-हीनु कांता । देखे तो जाणता । ‘पुत्र माते द्यावा’ कांता मागे ॥३९॥
॥ चीमूटी भस्माची ‘भक्षी ह्मणे योगी । भोगू जधी सरे । तदा लाभू ॥४०॥
॥ शेजारिणी नारी । बुद्धि-भेद--कारी । चिमूटी उत्कीरी । गोष्ठी फकी ॥४१॥२

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

Ashadhi Ekadashi 2026 Wishes in Marathi आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश मराठीत

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments