29 जानेवारीला संकष्टी चतुर्थी, पूजा विधि, महत्त्व जाणून घ्या
अनेक कष्टांपासून मुक्ति देणारी संकष्टी गणेश चतुर्थीचे हे व्रत 29 जानेवारीला आहे संततिला सगळ्या संकटांपासून वाचवण्यासाठी हे व्रत केले जाते.
संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्व-
चतुर्थी तिथि भगवन श्रीगणेशांना समर्पित असते.या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने भगवान श्रीगणेश प्रसन्न होवून सगळ्या प्रकारचे संकट दूर करतात. पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रामूख्याने महिला आपल्या संततिच्या दीर्घायुष्यासाठी ठेवतात. अशी मान्यता आहे की हे व्रत केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख आणि समृद्धीची प्राप्ति होते. या दिवशी भगवान श्रीगणेशांनी माता पार्वती आणि भगवान शंकराची प्रदक्षिणा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केली होती. म्हणून या व्रताचे विशेष महत्व आहे.
पूजा विधि-
गंध, अक्षद, फूल, धूप, दीप, नैवेद्य, नारळ यांनी भगवान श्रीगणेशांची विधिवत पूजा करावी आणि चंद्राला अर्घ्य द्यावे. चंद्राला अर्घ्य देतांना ॐ चन्द्राय नमः, ॐ सोमाय नमः या मंत्राचे उच्चारण करावे . व्रत करणाऱ्या व्यक्तीला या दिवसाची विशेष प्रतीक्षा असते. व्रत करणाऱ्यांनी संभव असल्यास दहा महादान करावे त्यात अन्नदान, मीठदान, गुळदान, स्वर्णदान, तिळाचे दान, वस्त्र दान, गौघृत दान म्हणजे गायीचे तूप, रत्नाचे दान, चांदीचे दान, साखरेचे दान. असे महादान केल्याने व्यक्ती दुःख-दारिद्रता, कर्ज, रोग आणि अपमाना पासून मुक्ती मिळवतो.
विद्यार्थी वर्गाने गणेश चतुर्थीच्या दिवशी ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेस जप केल्याने प्रखर बुद्धि आणि विद्या प्राप्त होते. ॐ एक दन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात। हया मंत्राचा जप जीवनातील सर्व संकट आणि कार्यात येणाऱ्या बाधांना दूर करतो.
मुहूर्त-
संकष्टी चतुर्थी तिथि: 29 जानेवारी 2024, सोमवार