सोमवार, 20 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (08:55 IST)

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

mahadev
आजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांनी दिवसातून एकदाच भोजन घ्यावे. पूजेच्या वेळी भोलेशंकरांची आरती आणि कथा वाचली पाहिजे. यासह भोलेनाथांचे मंत्रही जप केले पाहिजेत. आपण पूजेच्या वेळी जप करावा अशा शिव मंत्रांचे पठण करूया.
 
महादेव मंत्र:
महामृत्युंजय मंत्र:
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
 
महादेव मूळ मंत्र:
ऊँ नम: शिवाय।।
महादेवाचं प्रभावशाली मंत्र:
ओम साधो जातये नम:।।
ओम वाम देवाय नम:।।
ओम अघोराय नम:।।
ओम तत्पुरूषाय नम:।।
 
मंत्र:
ओम ईशानाय नम:।।
ॐ ह्रीं ह्रौं नमः शिवाय।।
 
Edited By - Priya Dixit