गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह - भाग ११

३१ माणीक अडमंग
 
॥ ग्रामी भामापूरी । गोदा तीरावरी । माणीकु कृषीकू । गोंरक्षासी ॥४०३॥
॥ अन्नपाणी देई । गोरक्षु तोषला । वर मागे म्हणे । गोरक्षु त्या ॥४०४॥
॥ माणिकु गोरक्षा । नाथा ह्मणे ‘तूचि । ‘मागें वर मातें । तदा नाथू ॥४०५॥
॥ त्यांते म्हणे देई, । करू, नको काई । मनाशी रुचे ते । तेचि त्यागी ॥४०६॥
॥ तापसी माणीकू । केली येणें रीति । कीर्तू त्याची होई । अलौकिकू ॥४०७॥
 
३२ तप - फल
 
॥ बद्री केदारासी । चौरंगी तपे तो । पाहुनी गोरक्षु । तया तोषे ॥४०८॥
॥ नवीन तयासी । हस्तपाद येती । जपांती केवला । किमया होई ॥४०९॥
 
३३ मच्छिंदर देह
 
॥ प्रयागीसी होता । शशांगरु देही । चौरंगी कुमारू । भेटे त्यासी ॥४१०॥
॥ सिंहासनी स्थापी । स्वकीय तो पुत्रू । कृष्णांगरु ज्यातें । पूर्व नामू ॥११॥
॥ आतां मच्छिंदरु शशांगर देहो । त्यागी, परी त्यासी ना स्वदेही ॥१२॥
॥ गोरक्षु झुंजला । वीरमद्रा गणां मच्छिंदरु कर्दमा । आणीतला ॥१३॥
॥ वीरमद्रा देई । संजीवू गोरक्षु । शंकरासी तोषू । देई ऐसा ॥१४॥
॥ मच्छिंदरु गोरक्षु । अंडबंगु, धर्मूं । चौघे नाथु जती । यात्री जाती ॥१५॥
॥ माणीकू कृषीकू । अडदांड जाती । तपस्वी नामासी । अडबंगू ॥१६॥
॥ प्रगागासी त्यासी । धर्मानाथु मेटे । घेवोनीज सर्वातें यात्रा चाले ॥१७॥
 
३४ रेवण नाथ
 
॥ रेवा तीरी बाळ । वालूमाजी मिळे । सहनु सारूकें । पाळीयेलें ॥१८॥
॥ कृषीका ती विद्या । पितयानें एकू । दिली, परी त्यासी । अनुग्रहो- ॥१९॥
॥ दत्तात्रेय गुरु । यांचा तो प्रसाद । सिद्धि वश त्यासी । तोचि छंद ॥२०॥
॥ प्राण्यां-जनां-ग्रामां । मिष्टान्नांनीं भोजी । दत्तात्रेयां कोठें । भिक्षान्नें जी ॥२१॥
॥ तदा दत्तनाथ तपूं त्यासी दीले । ब्रह्मज्ञानी होई । रेवणू तो ॥२२॥
॥ विटें ग्रामामाजी "। रेवणू राहीली सप्त बालकांतें । सोडवीले ॥२३॥
॥ यमपूरीज तैसी । कैलासीहि जाई । आणूनीया आई । तोषवीली ॥२४॥
 
वट सिध्द - नागनाथ
 
॥ कोणी कोशधर्मा । वृक्षीं वटा तली । बाळातें पाहोनी । गेहीं नेतु ॥२५॥
॥ बाळ तो खेळतो । अन्न संतपर्णी । मिष्टान्नें लटकी । दानी शूर ॥२६॥
॥ कोणी नारायणू । जन्मा आला योगी । आविर्होतृ नरू । रुपें येई ॥२७॥
॥ ‘दत्तात्रेया नाथा । भेटवावें ताता’ । विनवितो बाळ । वट-सिध्द ॥२८॥
॥ पांचाळी शोधीतू । येई मातापूरी । तैसा कोल्हापूरी । काशीतहि ॥२९॥
॥ पक्वान्नें मिष्टान्नें । सर्वा वाढीताहे । दत्त गुरु येती । भेटायातें ॥३०॥
॥ नाथु तेथें येतां । भिक्षेचिया मिषे- । पाय धरी, तोषें । अन्तरी तो ॥३१॥
॥ उभय ते क्षेत्री । काशीपुरी येती । शिवासीहि भेटी । तेथें दोघां ॥३२॥
॥ तेथोनि यात्रेसी । भूमीवरी जाई । वडिवाळी राही । सर्वा क्षेमू ॥३३॥
॥ मच्छिंदु पारखी । येई तो या ग्रामी । विद्या शस्त्रें अस्त्रें । ओपी तया ॥३४॥