Marathi Biodata Maker

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २३

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:00 IST)
 
इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरितां गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतहि तेथेंच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करुन कुबेर आपल्या स्थानीं गेला. अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला; परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला; त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेविलें. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसति स्थान केलें. त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली. विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें. पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहून शके दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या.
 
कबरीच्या घाटाच्या समाधि बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता कीं, पुढें यवनराजाकडून उपद्रव होऊं नये. एकदां औरंगजेबबादशहानें ह्या समाधि कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरुन लोकांनीं त्यास सांगितलें कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठांत कान्होबा; पर्वती; मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असें ऐकून त्यानें तीं नांवें पालटून दुसरीं ठेविलीं, तीं अशीं : जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.

सर्व पहा

आर्थिक चणचण दूर होणार! गुरुवारी करा तुळशीचे ४ सोपे तोडगे

श्री दत्ताची आरती- त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा |

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

आज नारळी पौर्णिमा! नारळ समुद्राला अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या परंपरा

रक्षाबंधन २०२६: भावाच्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुकूल रंगाची राखी बांधा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments