गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रामाची शेजारती

Ram Navami
आरती आरती ऐक्यभावे ओवाळूं। प्रकाश स्वयंज्योती निजतेजें बंबाळूं।।ध्रू।। 
परमात्मा श्रीराम महामाया जानकी। विश्रांती पावली गजर न कीजे सेवकी ।।1।।
स्नेह ना भाजन नाही वार्ता पावक। सबाह्याभ्यंतरी अवघा निघोट दीपक।।2।।।
ऐक्याचे सुमनशेजे आत्म रघुपती। राजाराम रघुपती। वाचा परूषली शब्द न बोलावे पुढती।।3।।।
राम आणि दास चैतन्य पहुडले रामीं। हेंही बोलवया दुजा नुरे ते धामी।। आरती।।4।।।