मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 डिसेंबर 2018 (00:58 IST)

स्वप्न जे सांगतात धन लाभ की धन हानी होणार आहे

स्वप्न जे सांगतात की धन लाभ होणार आहे की धन हानी : स्वप्न सर्वांनाच दिसतात. त्यातून काही स्वप्न चांगल्या भविष्याकडे संकेत करतात, तर काही भविष्यात येणार्‍या अडचणींबद्दल सांगतात. स्वप्न ज्योतिष्यानुसार काही स्वप्न आम्हाला धन प्राप्तीचे संकेत देतात तर काही धन नाश बद्दल सूचित करतात. या संकेतांना समजून आम्ही जाणून घेऊ शकतो की आम्हाला केव्हा धनप्राप्ती होणार आहे आणि केव्हा नुकसान? हे स्वप्न या प्रकारे आहेत -
 
धन लाभाशी संबंधित स्वप्न  
 
1. जर कोणी स्वप्नात आगपेटी पेटवतो तर त्याला अनपेक्षित धन प्राप्ती होऊ शकते. 
2. स्वप्नात जर कोणाला धन उधार देता तर त्याला अत्यधिक धन प्राप्ती होऊ शकते.
3. जी व्यक्ती स्वप्नात मोती, मूंगा, हार, मुकुट इत्यादी बघतो, त्याच्या घरात लक्ष्मी स्थायी रूपेण निवास करते.
4. जर कोणी स्वप्नात कोणाला चेक लिहून देतो तर त्याला विरासतीत धन मिळू शकत आणि त्याच्या व्यवसायात देखील वृद्धी होऊ शकते.
5. जी व्यक्ती स्वत:ला केशविहीन (गंजा) बघतो, त्याला देखील धन प्राप्ती होण्याचे योग असतात.
6. जर कोणी स्वप्नात हे बघितले की त्यांच्यावर कानूनी खटला चालवण्यात येत आहे आणि त्यातून तो निर्दोष सुटून जातो तर त्याला धन संपदांची प्राप्ती होऊ शकते.
7. स्वप्नात जर मान मुचकली तर त्या व्यक्तीला देखील धन लाभ होऊ शकतो.
8. स्वप्नात जर पिकलेले संत्री दिसले तरी देखील त्याला लवकरच धन-संपती प्राप्त होऊ शकते.
9. ज्या व्यक्तीला शेतात पिकलेले गहू दिसतात तो लवकरच धनवान बनतो.
10. ज्याला स्वप्नात उंट दिसतो त्याला देखील अपार धन लाभ होण्याची शक्यता असते.
धन हानीशी संबंधित स्वप्न
 
1. स्वप्नात जर कोणाला रिकामी बैलगाडी दिसली तर त्याला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
2. जर कोणी स्वप्नात स्वत:च्या घराचे फर्निचर किंवा खिडकी तोडताना दिसते तर त्याची स्थिती भिकारी सारखी होऊ शकते.
3. जर तुम्हाला एखादा असा स्वप्न दिसेल ज्यात तुम्ही स्वत:ला दिवालिया घोषित करून द्याल तर त्या व्यक्तीचा व्यवसाय पूर्णपणे चौपट होऊ शकतो.
4. स्वप्नात जर कोणी वर्तमान पत्रात आपल्या नातेवाइकांबद्दल वृत्त वाचतो तर त्याला देखील धन हाणी होऊ शकते.
5. स्वप्नात जर कोणाला घुबड दिसत तर त्याला धनहानी होण्याची शक्यता असते आणि कष्ट देखील उचलावे लागते.  
6. जर कोणी व्यापारी स्वत:ला गढ्यात पडताना पाहतो तर त्याला व्यापारात मोठी हानी होण्याची शक्यता असते.
7. ज्या व्यक्तीला स्वप्नात सोनं मिळालेलं दिसत, त्याला धन-संपत्तीची हानी होण्याची शक्यता असते.
8. जर कोणी धनवान व्यक्ती स्वप्नात चिमणीला रडताना बघतो तर तो लवकरच रस्त्यावर येतो अर्थात त्याचे धन, वैभव व ऐश्वर्य इत्यादी सर्व नष्ट होऊ शकत.