सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (15:09 IST)

Vivah Panchami विवाहपंचमीला अविवाहित मुलींनी करा हे उपाय, मिळेल इच्छित वर!

vivah panchami
Vivah Panchami मार्गशीर्ष महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. या महिन्यात येणारे सर्व प्रकारचे व्रत आणि सण यांचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी विवाह पंचमी हा सण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.धार्मिक मान्यतेनुसार भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह याच दिवशी झाला होता. त्यामुळे हा दिवस भगवान राम आणि माता सीता यांचा विवाहोत्सव म्हणून साजरा केला जातो. अनेक राम मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासोबतच प्रभू राम आणि माता सीता यांचीही घरी पूजा केली जाते.  जाणून घेऊया विवाह पंचमी कधी असते आणि तिचे महत्त्व काय आहे?
 
विवाह पंचमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यंदा विवाहपंचमीचा सण 17 डिसेंबरला साजरा होणार आहे. इतर काही राज्यांमध्ये नागपंचमीचा सणही याच दिवशी साजरा केला जातो. या दिवशी प्रभू राम आणि माता सीता यांची पूजा विधीनुसार करावी. याने भगवान राम प्रसन्न होतात आणि भक्ताची इच्छा लवकर पूर्ण करतात.
 
पंचमी तिथी कधी सुरू होते?
मार्गशीर्ष महिन्याची पंचमी तिथी 16 डिसेंबर रोजी रात्री 08:16 पासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 डिसेंबर रोजी रात्री 07:26 वाजता समाप्त होते. त्यामुळे उदयतिथीनुसार विवाहपंचमीचा सण 17 डिसेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.
 
अविवाहित मुलींनी या दिवशी हे उपाय करावेत
कोणत्याही कुमारी मुलीच्या लग्नात विघ्न येत असतील तर विवाह पंचमीच्या दिवशी त्यांनी काही उपाय केले तर त्यांना प्रभू रामसारखा आदर्श पती मिळेल. विवाह पंचमीच्या दिवशी अविवाहित मुलीने भगवान राम आणि माता सीतेची पूजा करावी आणि ओम जानकी वल्लभय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येणारे संकट दूर होतील.
 
या दिवशी काय करू नये
विवाह पंचमीच्या दिवशी चुकूनही लग्न करू नका. यासोबतच तामसिक अन्न अजिबात खाऊ नये. याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.