1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 21 मे 2025 (07:55 IST)

बुधवार :बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

Wednesday  what to do and what not to do on Wednesday  बुधवार  बुधवारी काय करावं आणि काय नाही
बुधवारचे स्वरूप परिवर्तनशील आणि सौम्य मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे गणपती आणि लाल किताबानुसार आई दुर्गेचा दिवस आहे. कमकुवत मेंदू असणाऱ्यांनी बुधवारचे उपास करायला हवे. कारण बुधवार हे बुद्धीप्राप्त करण्याचा दिवस आहे.
 
हे करावं :
1 कोरडं कुंकू लावा.
2 बुधवारी दुर्गेच्या देऊळात जावे.
3 पूर्व दक्षिण आणि नेऋत्य (पश्चिमी) दिशेने प्रवास करावा.
4 या दिवशी धन संचित केल्याने भरभराटी येते.
5 मंत्रणा, मंथन आणि लेखन कार्यासाठी हा दिवस योग्य आहे.
6 ज्योतिष, शेअर, दलाली सारख्या कार्यांसाठी हा दिवस शुभ आहे.
7 देऊळाच्या बाहेर बसलेल्या मुलीला बुधवारी अक्खे बदाम द्यावे. जेणे करून घरातील रोगराही नाहीशी होते. 
 
हे करू नये :
1 उत्तर पश्चिम आणि ईशान्य दिशेने प्रवास करू नये.
2 बुधवारी हिरव्या भाज्या सोडून द्यावा.
3 बुधवारी पैश्यांची देवाण घेवाण करू नये.
4 बुधवारी मुलीच्या आईने आपले डोकं धुवू नये, असे केल्यास मुलीला आजार येतो. किंवा तिला कुठल्या तरी समस्येला सामोरी जावं लागतं.
 
Edited By- Priya Dixit