testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

5 फेब्रुवारी संध्याकाळपासून सुरू होईल अग्नी पंचक

panchak
Last Modified मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (11:16 IST)
ज्योतिष शास्त्रात शुभ-अशुभ मुहूर्तांच्या विषयात वेग वेगळ्या मान्यता आहे. हिंदू धर्मात कुठले ही शुभ कार्य करण्याअगोदर शुभ-अशुभ मुहूर्तांबद्दल अवश्य विचार केला जातो. ज्योतिषीप्रमाणे, काही नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करणे फारच उत्तम मानण्यात येते. तसेच काही नक्षत्रांमध्ये एखादे विशेष कार्य करण्याची मनाई असते. धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती देखील अशाच नक्षत्रांचा समूह आहे. धनिष्ठाच्या प्रारंभापासून रेवती नक्षत्राच्या शेवटापर्यंतचा काळ पंचक असतो. यंदा 5 फेब्रुवारी, मंगळवारच्या संध्याकाळपासून 5.33 पासून पंचक सुरू होईल, जो 10 फेब्रुवारी, रविवारच्या संध्याकाळी किमान 04.22 पर्यंत राहणार आहे.


नक्षत्रांचा प्रभाव आणि पंचकाच्या दरम्यान कोणते 5 काम करणे निषेध आहे -

1. पंचकात जेव्हा घनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा गवत, लाकूड इत्यादी इंधन एकत्रित नाही करायला पाहिजे, याने अग्नीची भिती असते.

2. पंचकाच्या दरम्यान दक्षिण दिशेत प्रवास करणे टाळावे, कारण दक्षिण दिशा, यमाची दिशा असते. या नक्षत्रांमध्ये प्रवास करणे धोकादायक ठरू शकते.

3. पंचकात जेव्हा रेवती नक्षत्र सुरू असेल त्या वेळेस घराची छत नाही टाकायला पाहिजे, असे विद्वानांचे मत आहे. यामुळे धन हानी आणि
घरात क्लेश होतो.
4. पंचकात पलंग तयार करणे देखील अशुभ मानले जाते. विद्वानांनुसार असे केल्याने फार मोठ्या संकट समोर येण्याची शक्यता आहे.

5. पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.

1 . रोग पंचक
रविवारी सुरू होणारा पंचक रोग पंचक असतो. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. या पंचकात कुठल्याही प्रकारचे शुभ कार्य करणे वर्जित असते. शुभ कार्यांमध्ये हे पंचक अशुभ मानले जाते.

2. राज पंचक
सोमवारी सुरू होणार्‍या पंचकाला राज पंचक म्हणतात. हे पंचक शुभ मानले जाते. याच्या प्रभावामुळे या पाच दिवसांमध्ये सरकारी कामांमध्ये यश मिळतो. राज पंचकात संपत्तीशी निगडित कार्य करणे शुभ मानले जाते.

3. अग्नी पंचक
मंगळवारी सुरू होणार्‍या पंचकाला अग्नी पंचक म्हणतात. या पाच दिवसांमध्ये कोर्ट कचेरी निर्णय, आपले हक्क मिळवण्याचे काम केले जातात. या पंचकात अग्नीचा भय असतो. हे अशुभ असते. या पंचकात कुठल्याही प्रकारचे निर्माण कार्य, औजार आणि मशीनरी कामांची सुरुवात करणे अशुभ मानले जाते. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

4. चोर पंचक
शुक्रवारी सुरू होणारा पंचक चोर पंचक असतो. ज्योतिषांप्रमाणे या पंचकात प्रवास करण्याची मनाई असते. या पंचकात घेवाण-देवाण,
व्यापार आणि कुठल्याही प्रकारचे सौदे नाही करायला पाहिजे. आणि जर कार्य तुमच्या हाताने केले गेले तर धन हानी होणे निश्चित असते.


5. मृत्यू पंचक
शनिवारी सुरू होणार्‍या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. नावाने ओळखले जाते की अशुभ दिवसापासून सुरू होणारे हे पंचक मृत्यूसमान त्रास देण्यासारखा असतो. या पाच दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचे जोखीमपूर्ण काम नाही करायला पाहिजे. याच्या प्रभावामुळे विवाद, अपघात इत्यादी होण्याचा धोका असतो.

6. त्याशिवाय बुधवार आणि गुरुवारी सुरू होणार्‍या पंचकात वर दिलेल्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे नसते. या दोन दिवसांमध्ये सुरू होणार्‍या पंचकांमध्ये पंचकाचे पाच कामाशिवाय बाकी सर्व शुभ काम करू शकता.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ, या प्रकारे करा पूजा

संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ, या प्रकारे करा पूजा
संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी ...

Sharad Poornima 2019: जाणून घ्या काय करावे काय नाही

Sharad Poornima 2019: जाणून घ्या काय करावे काय नाही
नेत्रज्योती वाढवण्यासाठी शरद पौर्णिमेला रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे त्राटक ...

शरद पौर्णिमा 2019 : या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला, या एका ...

शरद पौर्णिमा 2019 : या दिवशी लक्ष्मीचा जन्म झाला, या एका मंत्राने देवी होईल प्रसन्न
शरद पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी पूजन केल्याने देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची वर्षभर ...

Kojagiri Purnima व्रत विधी, अमृत वर्षाचा फायदा घ्या

Kojagiri Purnima व्रत विधी, अमृत वर्षाचा फायदा घ्या
शरद पौर्णिमा अत्यंत श्रेष्ठ तिथी आहे. हा दिवस कोजागरी व्रत या रुपात देखील साजरा केला ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...