रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (14:21 IST)

घरामध्ये तुळशीचे रोप कधी लावावे?

घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावायचे असेल तर आधी हे नियम, शुभ दिवस आणि लावण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
 
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व दिले जाते. तुळशी हे लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. त्यामुळे घरातील सुख, शांती आणि आर्थिक लाभासाठी लोक नियमितपणे तुळशीच्या रोपाची पूजा करतात. सहसा प्रत्येकाच्या घरात तुळशीचे रोप असते. पण कधी कधी तुळशीचे रोप सुकते किंवा नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच पडतो की तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वात चांगला दिवस कोणता असू शकतो?
 
ज्योतिषाचार्यांप्रमाणे तसं तर प्रत्येक दिवस शुभ आहे. पण शास्त्रात काही खास दिवस सांगण्यात आले आहेत, जेव्हा तुळशीचे रोप लावल्यास शुभ फळ मिळू शकते.
 
तुळशीचे रोप कधी लावावे?
धार्मिक शास्त्रात तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वोत्तम दिवस 'कार्तिक महिना' असे सांगितले आहे. हा महिना साधारणपणे दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येतो. जर तुम्हाला तुमच्या घरात नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर यापेक्षा दुसरा शुभ दिवस असूच शकत नाही.
 
'कार्तिक महिन्यात तुळशीचे रोप लावण्यासाठी गुरुवारचा दिवसही उत्तम मानला जातो. वास्तविक गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूला समर्पित आहे. तुळशी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे आणि ते भगवान विष्णूंचा अवतार आहे. अशात जर तुम्ही गुरुवारी घरामध्ये तुळशीचे रोप लावले तर तुम्हाला भगवान विष्णूची कृपाही प्राप्त होईल.
 
कार्तिक महिन्याव्यतिरिक्त, चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावू शकता. गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप घरी आणून लावा. शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. याशिवाय वैज्ञानिक दृष्टीकोनातून तुळशीची लागवड एप्रिल ते जून या महिन्यात करता येते, या काळात त्याची वाढही चांगली होते.
 
याशिवाय शनिवारी तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी तुळशीचे रोप घरी आणल्यास किंवा घराच्या अंगणात लावल्यास अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक संकटे दूर होतात.