सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

भगवान विष्णू चातुर्मासात चार महिने का झोपतात ?

ashadhi ekadashi
आषाढ (जुने-जुलै) मासाच्या देवशयनी एकादशी पासून सुरु होऊन कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) मासाच्या प्रबोधिनी एकादशी पर्यंत हा चातुर्मास्य असतो. आषाढीच्या अकराव्या दिवशी 'देवशयनी आषाढी एकादशी' येते आणि असे मानले जाते की ह्या चातुर्मासात देव विष्णू हे निद्रावस्थात जातात.
 
एका कथेनुसार ह्या चातुर्मासचा संबंध देव विष्णुच्या वामन अवताराशी आहे.
 
असुरराज बळीने विश्वजीत यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले होते. ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी अदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वरूप श्री विष्णूंनी अदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेणार आणि असुरराज बळीला पराजित करणार. आणि असं झाला... श्री विष्णू यांचा पांचवा अवतार म्हणजेच वामन अवतार.
 
असुरराज बळी दान-पुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राम्हणाचा आदर करत असे. एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना श्री विष्णू वामन अवतारात त्याठिकाणे पोहचले. ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करु शकतो. तेव्हा श्री विष्णूंनी दानमध्ये ३ पावले भूमीची मागणी केली.
 
मागणी स्वीकार्य करुन श्री विष्णूंच्या लहान वामन शरीराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी तीन पावले भूमीमधून एका पावलात पूर्ण धरती, दुसऱ्यात पावलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा कोणतीही जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीला विचारले की आता तिसरा पाऊल कुठे ठेवू.
 
तेव्हा बळीने स्वतःचे डोकं पुढे केलं आणि म्हणाला, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले की तो पाताळलोकावर राज करू शकतो.
 
असं मानलं जातं की बळीने श्री विष्णूंना त्याचसोबत पाताळलोकात राहाण्याचा अनुरोध केला. विष्णूंने हे स्वीकारले पण देवी लक्ष्मी सह सर्व देवतांना काळजी वाटली. 
 
देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताल लोकातून मुक्त करण्यासाठी युक्ती केली आणि एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे जाऊन त्याला आपला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले. भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निराश करायचे नव्हते, म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की तो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करेल, म्हणून या चार महिन्यांत भगवान विष्णू योगनिद्रामध्ये राहतात.