शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

स्मृती

स्मृती तुम्हाला दु:खी बनवते किंवा सूज्ञ बनवते. सतत बदलत राहाणार्‍या जगातील चांगल्या अथवा वाईट अनुभवांची आणि घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. ती तुम्हाला जखडून ठेवते. तुमच्या स्वभावाची कधीही न बदलण्याच्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते. तिला समृद्ध करते. त्यामुळे तुम्ही मोकळे होता. तुम्ही जे आहात ते तुमच्या स्मृतीमुळे आहात. जर तुम्ही अजाण असाल तर ते स्मृतीमुळे. जर तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला असेल तर तोही स्मृतीमुळे.
 
अनंताचे विस्मरण ही दु:खांतिका आहे. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. 
 
दु:खद स्मृती आणि बंधने यंच्यापासून सुटका कशी करून घ्यायची. 
 
जग आणि घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घ्या. भूतकाळातल घटना वर्तमानात अस्तित्वात नाहीत हे जाणून घ्या. भूतकाळाचा स्वीकार करा आणि सोडून द्या. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हा. साक्षात्कारी लोकांच्या संगतीत आणि सेवेत आत्मस्मृती वाढते. 
 
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार