रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By

रंगपंचमीचे रंग घरीच बनवा, कसे बनवावे जाणून घ्या

होळी आणि रंगपंचमीला बाजारात अनेक प्रकारचे रंग मिळतात. जे केमिकल वापरून बनवले जातात. हे रंग आपल्या त्वचेकरिता चांगले नसतात. चला तर जाणून घ्या घरीच आपण चांगल्या प्रकारे कसे रंग बनवावे. 
 
नैसर्गिक रंग- रंगपंचमीला पळस, गुलाबाच्या पाकळ्या, संत्रीचे साल, पोइ, पारिजात, अंबाडी, जास्वंद, तांदूळ, चंदन, कुंकुमच्या बिया, डाळिंबाचे साल, गुलमोहर, रुई, जांभूळ, बीट, झेंडू, यांपासून रंग बनवले जातात. 
 
1. कोरडा रंग- नैसर्गिक रंगांसोबत बाजारात कोरडा रंग देखील मिळतो. जसे की अबीर, गुलाल अश्या कोरडया रंगांचा उपयोग करावा. हे रंग लागलीच स्वच्छ होतात या रंगांबरोबर पाण्याचा उपयोग केला तरी काही समस्या होणार नाही. 
 
2. फूलांचे रंग- पाहिले रंग हे पळसाच्या फूलापासून बनत होते आणि त्यांना गुलाल संबोधले जायचे. हे रंग त्वचेसाठी चांगले असतात कारण यांमध्ये कुठल्याच प्रकारचे रसायन नासायचे. आज देखील ग्रामीण भागात हे रंग मिळतात. 
 
3. चंदनपासून रंग- एक चिमुटभर चंदन पावडरला पाण्यात भिजवल्यास नारंगी रंग तयार होतो. कोरडया लाल चंदनला तुम्ही गुलाल प्रमाणे वापरू शकतात आणि त्वचेसाठी देखील चांगले असते. दोन छोटे चमचे लाल चंदन पावडर घ्यावी. पाच लीटर पाणी घेऊन ते उकळवा आणि त्यात टाका मग त्यात 20 लीटर पाणी अजून टाकावे . 
 
रंग कसे बनवावे?
*लाल चंदनचा लाल गुलाबप्रमाणे उपयोग करू शकतात. दोन छोटे चमचे लाल चंदन पावडरला पाच लीटर पाण्यात टाकून उकळवा. 
*जास्वंदीच्या फूलला वाळवून त्याची पावडर बनवा आणि याचे प्रमाण वाढवण्यासाठी यात पीठ टाकावे . 
*डाळिंबाचे साल पाण्यात उकळवून देखील रंग बनवला जातो. 
*गुलमोहरच्या पानांना वाळवून त्यांची पावडर बनवावी, हिरवा रंग तयार होईल. 
*पालक, कोथिंबीर, पुदीना यांची पेस्ट करून पाण्यात मिक्स केल्यास ओला हिरवा रंग तयार होईल. 
*बीट किसुन घ्यावे व रात्र भर पाण्यात भिजुन ठेवा यामुळे गर्द गुलाबी रंग तयार होईल. 
*जांभूळ बारीक करून घ्यावे आणि पाण्यात मिक्स करावे यामुळे निळा रंग तयार होईल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik