सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (07:01 IST)

रंगपंचमी देवी-देवतांना समर्पित सण

1. फाल्गुन कृष्णपक्षाच्या पंचमीला खेळण्यात येणारी रंगपंचमी ही देवी-देवतांना समर्पित असते. असे मानले गेले आहे की या दिवशी पवित्र मनाने पूजा-पाठ केल्याने देवता स्वयं आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. कुंडलीत मोठमोठाले दोष या दिवशी पूजा केल्याने दूर होतात. 
 
2. म्हणतात की या दिवशी श्रीकृष्णाने राधावर रंग टाकला होता. म्हणून हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्री राधारानी- श्रीकृष्‍णाची आराधना केली जाते. रंगपंचमीला रंगानी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राधा कृष्णाला अबीर- गुलाल लावलं जातं. राधाराणीच्या बरसाणा येथे या दिवशी त्यांच्या मंदिरात विशेष पूजा व दर्शन लाभ होतात.
 
3. या दिवशी हवेत रंग-अबीर उडवल्याने वातावरणात सकारात्मकता पसरते. याचा प्रभावामुळे मन-मस्तिष्क प्रसन्न राहतं व वाईट कर्म- पापांचा नाश होतो. 
 
4. हा दिवस सात्विक पूजा- आराधना करण्याचा दिवस आहे. रंगपंचमीला धनदायक देखील मानले गेले आहे. 
 
5. या दिवशी श्रीकृष्णाने आपल्या गोपींसह रासलीला केल्यानंतर रंग खेळत उत्सव साजरा केला होता. या दिवशी शोभा यात्रा देखील काढल्या जातात. 
 
6. गोवा व महाराष्ट्रा रंग पंचमीला मच्छीमारांच्या वसाहतीत विशेष कार्यक्रम होतात. नाच-गाणं, मस्ती होते. लोक एममेकांना भेटायला त्यांचा घरी जातात व लग्नाची बोलणी करण्यासाठी हा दिवस उत्तम असल्याचे मानलं जातं.