शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. होळी
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (05:05 IST)

Rang Panchami 2024: रंग पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्व

Rang Panchami 2024: 30 मार्च रोजी रंग पंचमी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक ठिकाणी होळीसह पाच दिवस रंग खेळण्याची परंपरा आहे. रंगपंचमीच्या दिवशीच होळीचा सण पूर्ण होतो. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थान इत्यादी ठिकाणी रंगपंचमीचा सण विशेषतः साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रंगपंचमी हा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे.
 
रंग पंचमी महत्व
होळीप्रमाणे या दिवशीही अबीर-गुलाल उधळून एकमेकांना रंग चढवले जातात. असे म्हणतात की या दिवशी वातावरणात रंग उडवल्याने किंवा अंगावर रंग लावल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक शक्तींचा संचार होतो आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती क्षीण होतात.
 
रंग पंचमी सण का साजरा केला जातो?
धार्मिक मान्यतेनुसार, रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण राधा राणीसोबत होळी खेळायचे. या दिवशी राधा-कृष्णासह सर्व देवी-देवतांना अबीर गुलाल लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सुख-समृद्धी टिकून राहते असे म्हणतात. असे म्हणतात की या दिवशी देव-देवता पृथ्वीवर आशीर्वाद देण्यासाठी येतात. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी लोकांना देवांचा स्पर्श जाणवतो.
 
रंग पंचमी 2024 तिथी आणि शुभ मुहूर्त
फाल्गुन माह कृष्ण पक्ष पंचमी तिथी प्रारंभ- 29 मार्च रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटापासून
फाल्गुन माह कृष्ण पक्ष पंचमी तिथी समापन-  30 मार्च रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटावर
रंग पंचमी 2024 तिथी- 30 मार्च 2024