सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:25 IST)

एमा स्टोन बनली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

emma stone
जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट ‘ला ला लॅंड’ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन बनली असून फोर्ब्स मॅगझिनने एमा स्टोन सर्वाधिक कमाई करणारी महिला असल्याचे घोषीत केले आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 166.4 कोटी रूपये या 28 वर्षांच्या अभिनेत्रीने कमावले आहेत.
 
तिला ऑस्करकडून ‘ला ला लॅंड’ या चित्रपटात केलेल्या तगड्या अभिनयाचे बक्षीस म्हणून बेस्ट एक्‍ट्रेस या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे यासाठी यावर्षी तिने लिंग समानतेसाठीही आवाज उठवला होता. जगभरात ‘ला ला लॅंड’ चित्रपटाने जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
 
अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा या यादीत दुस-या क्रमांकावर असून गेल्या वर्षात जेनिफर एनिस्टनने 2.55 कोटी डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्‌समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ड्रामा फिल्म ‘द येलो बर्ड’ यामध्येही जेनिफर दिसली होती. याशिवाय ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड ऍम्बेसेडर देखील आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्स तिस-या क्रमांकावर आहे.