शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 6 मार्च 2021 (11:21 IST)

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली

हॉलिवूड सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्यूरियस(Fast & Furious)चे 8 चित्रपट आतापर्यंत रिलीज झाले असून या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आता प्रेक्षक या सिनेमाच्या 9 व्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. त्यानुसार हा चित्रपट 28 मे रोजी (Fast & 
Furious 9 Release Date) रिलीज होणार होता, पण आता चित्रपटाची रिलीज डेट पुढे सरकली आहे. या बातमीनंतर फास्ट ऍड फ्यूरियस फ्रेंचायझीचा पुढचा चित्रपट  पाहण्यास चाहते चाहते निराश झाले होते. 
 
पण, आता विन डीझलने प्रेक्षकांना एक चांगली बातमी दिली आहे. अभिनेत्याने आगामी चित्रपटासाठी नवीन प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विन डीझलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट चाहत्यांसह शेअर केली आहे. अभिनेत्याच्या पोस्टानुसार, आता फास्ट आणि फ्यूरियस 9 मे 28 ऐवजी 25 जूनला थिएटरमध्ये दणका देणार आहे. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते पुन्हा एकदा आनंदी झाले आहेत.
 
या चित्रपटाचा नवीन टीझर शेअर करताना विन डीजनने चाहत्यांसमवेत चित्रपटाची नवीन रिलीज डेट शेअर केली आहे. टीझरमध्ये असे दिसून आले आहे की नेहमीप्रमाणे या वेळेस फास्ट ऍड फ्यूरियसचा पुढचा चित्रपटही दमदार ठरणार आहे. विन डिझेलच्या घोषणेनंतर अभिनेत्याचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंटद्वारे आनंद व्यक्त करीत आहेत. बरेच लोक या पोस्टवर कमेंट करत विन डीझलबरोबर आनंद व्यक्त करत आहेत.