1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (12:04 IST)

नेटवर्क नसलं तरी कॉल करता येईल

jio offer
Jio सिम वारपत असणार्‍यांसाठी नेटवर्क नसलं तरी कॉल करणे शक्य आहे. जिओने वाई-फाई कॉलिंग नावाची एक नवी सर्व्हिस प्रस्तुत केली आहे ज्यात नेटवर्कशिवाय कॉल करता येईल. या सर्व्हिसचा फायदा त्या लोकांना मिळेल जे इंटीरियर भागात राहतता किंवा जेथे नेटवर्कची समस्या असते.
 
फ्री मध्ये सर्व्हिस 
यासाठी जिओ कुठलीही एक्स्ट्रा फी आकाराणार नाही. यासाठी वेगळ्याने‍ रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. ही सर्व्हिस पूर्णपणे फ्री आहे. केवळ आपण जो डिव्हाइस वापरत असाल त्यात वॉयस प्लानसह HD वॉयस सपोर्ट असले पाहिजे. आपल्याला हवं असल्यास वाई-फाई हून VoLTE सर्व्हिसमध्ये स्‍विच करु शकता. 
 
काय आहे Wi Fi कॉलिंग सर्व्हिस 
Wi Fi कॉलिंग ज्याला आम्ही वॉयस ओव्हर वाई-फाई कॉलिंग देखील म्हणतो, या मदतीशिवाय देखील नेटवर्क नसताना वाई-फाईने कॉल करता येईल. जर आपल्या घरात वाई-फाई लावलेलं असेल तर फोन त्या नेटवर्कशी कनेक्ट करा, आपण कोणतीही नेटवर्कचे वाय-फाय वापरु शकता.