बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मार्च 2021 (13:21 IST)

Reliance Jio : 5 स्वस्त नवीन डेटा व्हाउचर लॉन्च, 22 रुपयात देखील मिळल भरपूर डेटा

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी सोनेरी संधी घेऊन आली आहे. कंपनीने 5 नवीन डेटा व्हाउचर लॉन्च केले आहेत. हे डेटा व्हाउचर केवळ जिओ ग्राहकांसाठी लॉन्च केले गेले आहेत. जिओच्या नवीन 5 डेटा व्हाउचर्सची सुरुवाती किंमत केवळ 22 रु आहे जेव्हाकि सर्वात महाग व्हाउचर 152 रुपयांचे आहे. जाणून घ्या या नवीन डेटा व्हाउचर्सची डिटेल्स-
 
22 रु, 52 रु आणि 72 रु प्लान 
नवीन लॉन्च करण्यात आलेल्या प्लान्सची किंमत 22 रु, 52 रु, 72 रु, 102 रु आणि 152 रु आहे. 22 रु डेटा व्हाउचरमध्ये 2 जीबी डेटा मिळतो. या प्लानची वॅलिडिटी 28 दिवसांसाठी आहे. 52 रु आणि 72 रु असलेल्या प्लानची वैधता देखील 28 दिवसांची आहे. 52 रुपयांच्या प्लानमध्ये आपल्याला 28 दिवसांसाठी एकूण 6 जीबी डेटा मिळेल. तसेच 72 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 500 एमबी डेटा मिळेल. या‍ तिन्हीपैकी कोणत्याही प्लानमध्ये आपल्याला इतर कुठलेही बेनेफिट ‍मिळणार नाही, ज्यात कॉलिंग आणि एसएमएस सामील आहेत.
 
102 रु आणि 152 रुपयांचे प्लान 
102 रु आणि 152 रुपयांच्या दोन्ही डेटा व्हाचर्सची वॅलिडिटी 28 दिवसांसाठी आहे. यात 102 रुपयांच्या प्लानमध्ये आपल्याला 28 दिवस दररोज 1 जीबी डेटा मिळेल. तसेच 152 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. या दोन्ही योजनेतदेखील केवळ डेटा बेनेफिट मिळेल. कॉलिंग, एसएमएस किंवा इतर कोणत्याही बेनेफिटसाठी आपल्याला वेगळ्याने रिचार्ज करावे लागेल. 
 
जिओ ग्राहकांसाठी ऑल-इन वन प्लान 
ग्राहकांसाठी आधीपासूनच 5 ऑल-इन वन प्लान सुरु आहे. या पाची प्लान्समध्ये आपल्याला डेटासह कॉलिंग, एसएमएस आणि जिओ अॅप्स सब्सक्रिप्शन देखील ‍मिळेल. या प्लान्सची ‍किंमत 75 रु, 125 रु, 155 रु, 185 रु आणि 749 रु आहे।
 
5 प्लान्सची माहिती
75 रु, 125 रु आणि 155 रु 
यांची वैधता 28 दिवसांची आहे. 75 रुपयांच्या प्लानमध्ये आपल्याला दररोज 100 एमबी डेटा, 50 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिट आणि जिओ अॅपस फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. 125 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 500 एमबी डेटा आणि एकूण 300 एसएमएस मिळतील. या प्लानचे इतर बेनेफिट 75 रुपयांच्या प्लानसारखेच आहेत. याप्रकारे 155 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि डेली 100 एसएमएस मिळतील. इतर बेनेफिट 75 रु आणि 125 रुपयांच्या प्लान्सप्रमाणेच आहे.
 
185 रु आणि 749 रुपयांचे प्लान्स 
185 रुपयांच्या प्लानमध्ये आपल्याला 28 दिवसांपर्यंत दररोज 2 जीबी डेटा, 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिट आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन ‍मिळेल.  749 रुपयांचा प्लान लांब अवधी असणार प्लान आहे. याची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लानला 28-28 दिवसांच्या 12 अवधी वाटता येऊ शकतं. प्रत्येक सायकलमध्ये आपल्याला 2 जीबी डेटा आणि एकूण 50 एसएमएस मिळू शकतील. इतर अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिट आणि जिओ अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन देण्यात येईल.